Friday, 6 March 2020

सततच्या पिंपल्स येण्याने त्रस्त होत असताल तर हे सोपे उपाय करून बघा !!


पिंपल्स येणे हि आजकाल तारुण्यातील एक कॉमन समस्या होऊन गेली आहे. पिंपल्स येण्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आजकाल प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पिंपल्स हे कोणत्याही वयात यायला लागले आहेत. पिम्पल्सने आपले सौंदर्य बिघडते. अनेकदा आपण पिंपल्स लपवण्यासाठी अनेक गोष्टी करून बघतो. पिम्पल्सने अक्षरशः चेहरा झाकण्याची वेळ अनेकदा येऊ शकते.

पिंपल्स हे आपोआप जातात असा आपला समज असतो. पण पिम्पल्सवर वेळेत उपचार करणे देखील महत्वाचे आहे. कारण वेळेत उपाय नाही केले तर त्याचे चेहऱ्यावर काळे डाग देखील पडू शकतात.

पिंपल्स दूर करण्यासाठी बाजारात अनेक ब्युटी प्रोडक्ट उपलब्ध आहेत. पण त्यामध्ये होत असलेला केमिकलचा वापर हा आपल्या चेहऱ्यासाठी नुकसान करणारा ठरू शकतो. पिंपल्स दुर करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. जाणून घेऊयात खासरेवर..
त्वचेची स्वच्छता राखा-

त्वचेवर आपल्या भरपूर छिद्र असतात. त्वचेवर प्रदूषणामुळे धूळ आणि घाण चिटकून राहते. त्यामुळे त्वचेची स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे.
पिम्पल्सच्या चांगल्या क्रीम देखील आहेत उपलब्ध-

पिंपल्सचा आकार मोठा असेल तर त्यावर वेळीच उपचार घेणे कधीही चांगले. बाजारात उपलब्ध असलेल्या अँटी ऍक्ने क्रीम घेऊन या. या क्रिमची निवड तुमच्या स्किन टाइपनुसारच हवी. जर ही क्रिम तुमच्या त्वचेला सूट करत नसेल तर वापर करू नये.
पिंपल्ससाठी एस्प्रिन गोळी-

चेहऱ्यावर फार जास्त पिंपल्स आले असतील तर एस्प्रिनची टॅबलेट बारिक करून पिंपल्सवर लावा. याने फायदा होईल. पण यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
खोबऱ्याचं तेल आणि टी ट्री ऑइल-

त्वचेची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी खोबऱ्याचे तेल देखील खूप उपयोगाचे आहे. खोबऱ्याचं तेल आणि टी ट्री ऑइलचा एकत्र वापरही अधिक फायदेशीर ठरू शकतो. हे दोन्ही एकत्र करून कॉटनच्या मदतीने ते रात्रभर पिंपल्सला लावून ठेवा.दोन ते तीन आठवड्यात तुम्हाला पिंपल्सपासून सुटका मिळेल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

डास चावण्यामागे असतात ही काही प्रमुख कारणे !!


तुम्हाला कधी डास चावले आहेत का ? किती मूर्खपणाचा प्रश्न आहे. डासापासून भले कोण वाचलं असणार ? कधीकधी असे वाटते की हे डास डासांनाही चावत असतील. सवयच असते त्यांना चावायची. पण एखादा माणूस असा असतो ज्याला डास जास्तच चावत असतात, त्यामागे बरीच कारणे आहेत.
जगात काहीही विनाकारण होत नाही. आज आम्ही सांगणार आहोत तुम्हाला डास जास्त का चावतात…

जास्त डास चावण्यामागची खरी कारणे:

१) जर आपले रक्त गोड असेल तर डास आपल्याला जास्त चावतात. बऱ्याचदा आपल्याला असे ऐकायला मिळाले असेल. परंतु खरं कारण हे आहे की, ‘O’ रक्तगटाकडे डास जास्त प्रमाणात आकर्षित होतात. या रक्तगटामध्ये असणारे काही विशेष घटक डासांना आकर्षित करतात.


२) आपल्या त्वचेमध्ये लॅक्टिक ऍसिड आढळते. जर त्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर डासांची पर्वणीच झाली म्हणून समजा, म्हणजेच जास्त डास चावतील.


३) शरीराचे तापमानदेखील जास्त डास चावण्यामागचे एक मोठे कारण आहे. व्यायाम करताना शरीराचे तापमान वाढते, म्हणूनच व्यायामानंतर अधिक डास चावतात.


४) आपल्या योग शिक्षकाने आपल्याला दीर्घ श्वास घ्यायला सांगितले असेल. पण ते डासांसाठीच जास्त फायद्याचे असते. कारण जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो तेव्हा सोडतो देखील जास्त. शरीरातून कार्बनडायऑक्साईड बाहेर सोडताना त्यात आपल्या शरीराचा गंध मिसळलेला असतो. त्यावरूनच डास कोणत्या शरीराला शिकार करायचे आहेत हे ठरवतात. दीर्घ श्वास डासांना अनुमान लावण्यासाठी उपयुक्त ठरतात.


५) गर्भवती महिलांनाही डास जास्त चावतात. वास्तविक गर्भवती महिलांचे तापमान इतर स्त्रियांपेक्षा जास्त असते म्हणून डास त्यांना जास्त डास चावतात.


६) अमेरिकन डास नियंत्रण असोसिएशनच्या म्हणण्यानुसार जगात ३००० हून अधिक डासांच्या प्रजाती आहेत. त्यातील कित्येक डास तर इतके घातक आहेत की माणसाचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते.


७) नर डास चावत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. केवळ मादी डास चावतात. आपल्या शरीराच्या रक्तामुळे मादी डासांची अंडी जलद तयार होतात. म्हणजेच डासांची पैदास वाढणे ही आपल्या शरीरातील रक्ताचीच कमाल आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

या काही सवयींमुळे होऊ शकते मेंदूला नुकसान !!



फक्त जखम झाल्यावर किंवा चुकीच्या औषधींमुळेच मेंदूला नुकसान पोहोचते असे नाही तर दिवसभराच्या धावपळीत आपण अशा चुका करतो ज्याचा आपल्या मेंदूवर वाईट प्रभाव पडतो.

जाणून घेऊया अशाच काही सवयी ज्यांच्यामुळे मेंदूला नुकसान होऊ शकते..



पुरेशी झोप न घेणे : 


कमीत कमी ७ तासांची पुरेशी झोप घेतली नाही तर मेंदूला व्यवस्थित आराम मिळत नाही. त्यामुळे मेंदूवर वाईट प्रभाव पडू शकतो. परिणामी काळानुसार मेंदूची काम करण्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते.



बराच काळ एकाकी राहणे : 

जास्त काळ एकाकी राहणे हे देखील मेंदूच्या आरोग्यासाठी चांगली बाब नाही. एकटेपणाचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. तसेच भविष्यात अल्झायमरचा धोका होण्याचीही मोठी शक्यता असते.
जंक फूडचा अति प्रमाणात वापर : 

जंक फुडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्याचा मेंदूच्या न्यूरॉन रिसेप्टरला धोका होऊ शकतो. असे जंक फूड अति प्रमाणात खाल्ल्यास डोकेदुखी, बेचैनी, उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

मोठ्या आवाजात गाणी ऐकणे : 

सतत तासनतास कानात हेडफोन किंवा इअरफोन लावून मोठया आवाजात गाणी ऐकल्यास त्या आवाजाचा मेंदूच्या टिश्यूजवर घातक परिणाम होतो आणि त्यामुळे अल्झायमरचा धोका होऊ शकतो.

क्रियाशील न राहणे : 
नियमित कोणताही शारीरिक क्रिया न केल्यास माणसाचे शरीर मधुमेह, हृदय विकार आणि उच्च रक्तदाब यासारख्या रोगांना बळी पडू शकते. या रोगांचा मेंदूवर वाईट परिणाम होतो.

स्मोकिंग : 

स्मोकिंग करत असताना आपल्या रक्तात घातक रासायनिक घटक जातात. परिणामी आपले रक्त घट्ट बनते. त्यामुळे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो आणि त्याचा मेंदूवर घातक परिणाम सुद्धा होतो.

अति आहार : 

अति आहाराचा थेट मेंदूशी संबंध येतो. अति आहार करण्याने माणसाच्या शरीरातील ऊर्जा खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्यासाठी खर्ची पडते आणि माणसाच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते.

नैसर्गिक प्रकाशात न राहणे : 

जास्त काळ अंधारात राहिल्यास किंवा नैसर्गिक प्रकाशात खूप कमी राहिल्यास माणसामध्ये एकप्रकारचे डिप्रेशन वाढत जाते. त्याचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. नैसर्गिक प्रकाशात राहिल्यास मेंदूला विचार करण्यास चालना मिळते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

सिक्स पॅकच्या मोहापायी मूत्रपिंड होऊ शकते निकामी !!



आपले शरीर बलदंड दिसावे असे कुठल्या तरुणाला वाटणार नाही. सिनेमातील हिरो लोकांची बॉडी पाहून सिक्स पॅक बनवण्यासाठी जीम जॉईन करणाऱ्या तरुणांची संख्या जशी वाढत आहे, तशीच जीमची संख्यादेखील वाढत आहे.


ध्येय एकच, काही करून स्टील बॉडी बनवायची आहे. मग त्यासाठी कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय स्टिरॉइड्स किंवा प्रोटीन सेवन करतील. परंतु हेच सेवन त्यांच्या शरीरासाठी किती घातक असू शकते याबद्दल त्यांना जराशीही कल्पना नसते. याच दुर्लक्षितपणामुळे मूत्रपिंड गमावण्याची दोन तरुणावर आली आहे.

व्यायामाबद्दल आवड असणे चांगली गोष्ट आहे. जीममध्ये जाणेही वाईट नाही. जीममध्ये तरुणांना लवकर रिझल्ट मिळवण्यासाठी सप्लिमेंट्री खाद्य सुरु करण्यास सांगितले जाते.
परंतु कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय एनाबोलिक स्टेरॉइड्स, ग्रोथ हार्मोन्स, हाई प्रोटिन डाएट, क्रिएटिन किंवा व्हे प्रोटिनचा अतिरिक्त वापर केल्यास शरीरासाठी महागात पडण्याची शक्यता असते असे संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. तरुणांच्या बेजबाबदारपणामुळे सप्लिमेंट्स विक्री करणारे बक्कळ पैसे कमावतात, पण याच तरुणांना स्वतःच्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
सप्लिमेंट्समुळे होऊ शकतो मूत्रपिंडाचा आजार

सौदी जर्नल ऑफ किडनी डिसिजेस अँड ट्रान्सप्लांटच्या अभ्यासानुसार जे लोक स्टेरॉइड्स घेतात, त्यांच्यामध्ये तिसऱ्या किंवा पाचव्या स्तरावर असाध्य असा किडनीचा विकार होण्याची शक्यता जास्त आढळते. त्याचा प्रजननसंस्थेवरही घातक परिणाम होऊ शकतो.

हृदय रोग, मानसिक रोग, यकृताचे रोग असे वेगवगेळे रोगही होउ शकतात. प्रत्येकाच्या शरीराची रचना, त्याचे अनुवांशिक आजार किंवा क्षमता वेगवगेळी असते, त्यामुळे एखाद्या चांगल्या तज्ञ मार्गदर्शकाच्या सूचनेनुसारच सप्लिमेंट्सचे सेवन करणे आवश्यक आहे.

दोन तरुणांचे मूत्रपिंड निकामी
औरंगाबाद शहरात दोन युवकांना याच सप्लिमेंट्स सेवनाचा फटका बसला आहे. त्यापैकी पहिला तरुण रोजच्या ४० अंड्यातून मिळणाऱ्या प्रोटीन व्यतिरिक्त बाहेरूनही जादा प्रोटीन सेवन करत होता. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याच्या दोन्ही मूत्रपिंडाचे कार्य थांबले असल्याचे सांगितले.

त्याच्यावर योग्य ते उपचार आणि आवश्यक त्या आहाराने पुन्हा त्याचे कार्य पूर्ववत करण्यात आले. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये अशाच एका बॉडी बिल्डरला मूत्रपिंड निकामी झाल्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Thursday, 5 March 2020

कशामुळे होतो ब्लड कॅन्सर ? लक्षणे आणि काळजी !!


सर्वसाधारणपणे कर्करोगात शरीराच्या विशिष्ठ अवयवात गाठ येऊन तिच्यात अनियमतरित्या वाढ होत असल्याची लक्षणे दिसताच योग्य ते उपचार घेता येतात. पण ब्लड कॅन्सरमध्ये असे नसते. हा कॅन्सर जिथून रक्ताच्या पेशी निर्माण होतात अशा बोन मॅरोपासून सुरु होतो.

ब्लड कॅन्सरमध्ये रक्तपेशींच्या विकासात किंवा कार्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शरीरात रक्ताचे जे कार्य असते, उदा.शरीराच्या विविध भागांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे, रोगप्रतिकार, रक्तस्राव रोखणे इत्यादि कामात अडथळा निर्माण होतो. ब्लड कॅन्सर हा सहाव्या क्रमांकाचा प्राणघातक आजार आहे.

ब्लड कॅन्सरचे तीन प्रमुख प्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमा. ल्युकेमियामध्ये शरीरात इतक्या अतिरिक्त प्रमाणात पांढऱ्या रक्तपेशी तयार होतात, की ज्यामुळे आपले शरीर संक्रामक रोगांचा प्रतिकार करु शकत नाही. लिम्फोमामध्ये आपल्या शरीरातील लिंफोसाइट्स पेशींवर प्रभाव पडून रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

मायलोमामध्ये आपल्या प्लाझ्मा पेशी प्रभावित होतात, ज्यामुळे आपले शरीर संक्रमणाविरोधात लढू शकत नाही. हे तिन्ही प्रकारचे कॅन्सर काहीप्रमाणात एकसारखेच असले तरी ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर प्रभाव टाकत असतात.
ब्लड कॅन्सरची लक्षणे

१) लहानशा जखमेतुन जास्त रक्त वाहणे. 
२) दिर्घकाळपर्यंत सांधेदुखी राहणे. 
३) त्वचेवर सतत खाज किंवा गाठी येणे. 
४) अचानकपणे जलदगतीने शरीराचे वजन कमी होणे. 
५) श्वास घेण्यास त्रास होणे. 

६) शरीरात अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे.
७) रात्रीच्या वेळी खूप घाम येणे. 
८) वारंवार सरसर्गजन्य रोग होणे. 
९) पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स अचानक कमी किंवा जास्त होणे. 
१०) सातत्याने हिमोग्लोबिन कमी होणे.

ब्लड कॅन्सरपासून बचावाच्या टिप्स

१) लाइफस्टाइल हेल्थ असावी. 
२) ब्लड कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स युक्त फळ आणि भाज्यांचा समावेश करावा. 
३) रोज अर्धा तास व्यायाम करावा. 

४) तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
५) धूम्रपान करु नका. धुम्रपानामुळे शरीरात विष तयार होते. त्यामुळे शरीरात ब्लड कॅन्सर सेल्सची वाढ होते. 

६) रेडिएशनच्या संपर्कात येणे टाळावे, कारण रेडिएशन हे रक्तापर्यंत सहज पोहोचतात. त्यामुळे ब्लड कॅन्सरची शक्यता वाढू शकते. 
७) केमिकल्सच्या संपर्कात येणे टाळावे, कारण घातक केमिकल्समुळे ब्लड कॅन्सरचा धोका वाढतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

चष्मा घालवण्यासाठी करा ५ हे घरघुती उपाय !!


आपले डोळे हे जन्माला आल्यानंतर मिळालेला सर्वात अनमोल असा अंग आहे, ज्याशिवाय आपले आयुष्य पूर्ण होत नाही. परंतु आपल्या सर्वांची दृष्टी एकसारखी नसते. त्यासाठी चष्मा वापरुन दृष्टिदोष दूर करता येतात. परंतु अनेकांना चष्मा वापरण्यात अस्वस्थपणा जाणवतो. चष्मा घालवण्यासाठी अनेक पुस्तकांतून किंवा डॉक्टरांकडून माहिती मिळते. मुळात चष्मा लागण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या डोळ्यांची क्षमता कमी होणे.

यामागची कारणे अनेक असू शकतात. परंतु चष्मा टाळण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय आहेत. यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे आहार आणि डोळ्यांसाठी काही व्यायाम समाविष्ट आहेत. या लेखात आपण चष्मापासून मुक्त होण्याचे काही आहार पाहणार आहोत…


१) गाजर : गाजरामध्ये बीटा कॅरेटिन नावाचे अँटीऑक्सिडेंट तसेच अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. अ जीवनसत्व डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असते. नियमितपणे गाजर खाणाऱ्यांना रातांधळेपणा हा रोग होत नाही. कच्च्या गाजराचे सेवन चष्मा घालवण्यासाठी आवश्यक आहे.


२) पालक : पालकामध्ये अ, ब, क, ई यासारखी जीवनसत्व, लोह, झिंक सारखी प्रतिकारक पोषकतत्वे आणि ल्युटीन आणि झिएक्सांथीन यासारखी प्रतिकारक खनिजे असतात. पालकांच्या नियमित सेवनाने वयानुसार कमी होणारी दृष्टी आणि मोतीबिंदूचा दोष दूर करण्यास मदत होते. तसेच आपला डोळ्यांच्या बाहुलीचा पडदा निरोगी राहतो.


३) दाणे : सुक्या मेव्यामध्ये चरबी आणि ई जीवनसत्व आढळते, जे डोळ्यांचा दाह कमी करण्यास मदत करते. ई जीवनसत्वामुळे मोतीबिंदूच्या त्रास दूर करता येतो. चष्मा घालवण्यासाठी सुकामेवा खाणे फायदेशीर असते.


४) शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये अ, ई, क जीवनसत्व आणि झॅक्सॅथिन, ल्युटीन सारख्या फायटोन्यूट्रिएंटचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे वयानुसार कमी होणारी दृष्टीचा त्रास कमी होतो. तसेच डोळ्याच्या पडद्याचे आरोग्य उत्तम राहते.

५) आंबट फळे : लिंबूवर्गीय फळांमध्ये क जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असते. शरीरातील चयापचयामुळे निर्माण होणाऱ्या विषारी पदार्थ नष्ट करण्यासाठी क जीवनसत्वात असणारे अँटीऑक्सिडंट्स उपयोगी पडते. त्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना नुकसान होत नाही आणि डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

चुकीच्या पद्धतीने आपण साठवत असलेले १२ खाद्यपदार्थ


कधीकधी, आपण आपल्या मनानेच घरातील अन्नपदार्थांची साठवण करत असतो, कारण आपल्याला कुणीतरी तसेच शिकवलेले असते. परंतु कधीकधी आपले अन्नपदार्थ चुकीच्या ठिकाणी साठवण्याने ते लवकर खराब होतात त्यांच्या चवीवरही परिणाम होतो.

१) कॉफी बीन्स : आपली कॉफीचे फ्रिजमध्ये ठेवू नका. फ्रीजमध्ये ठेवल्याने तिची चव कमी होते, तसेच कॉफी आर्द्र बनते; त्यामुळे आपल्या कॉफीचा स्वाद बिघडतो. त्याऐवजी कॉफी बॅग, कॅन किंवा सीलबंद जारमध्ये काउंटरवर ठेवा.


२) सफरचंद : घरी येणाऱ्या अतिथींना आपल्या स्वयंपाकघरातील काउंटरवरचा सफरचंदांचा एक गुलाबी वाडगा दाखवण्याचा मोह आपल्याला होतो. परंतु तोच वाडगा फ्रीजमध्ये ठेवल्यास सफरचंदाचे आयुष्य वाढू शकते. त्यांना प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवल्यास ती लवकर खराब होत नाहीत.


३) औषधी वनस्पती आणि मसाले : बरेच लोक आपले कोरडे मसाले आणि औषधी वनस्पती फ्रिजमध्ये किंवा स्वयंपाकाच्या शेगडीच्या वर फळीवर ठेवतात. ओलावा, उष्णता आणि प्रकाशामुळे या मसाल्यांना तेल सुटू शकत, ज्यामुळे त्यांचा फ्लेवर कमी होऊ शकतो. त्यापेक्षा मसाले बरणीत भरुन कपाटात ठेवा.


४) दाणे : माफ करा, पण ड्रायफ्रूट्स किंवा दाणे हे काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ उघड्या वातावरणात चांगले राहू शकत नाहीत. अक्रोड, काजू आणि बदामांसारखे ड्रायफ्रूट्स फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे, जिथे ते नऊ महिने टिकतील.


५) मेपल सिरप : बर्‍याच लोकांना असे वाटते की शुद्ध आणि कृत्रिम मेपल सिरप साठवण्यासाठी एकसारख्याच साठवणपद्धती वापरतात. परंतु सहा महिन्यांची एक्सपायरी डेट असणारे शुद्ध मेपल सिरप फ्रिजमध्ये ठेवणे महत्वाचे आहे.

६) ब्राऊन साखर : आपली ब्राऊन शुगर फ्रिजमध्ये ठेवल्यास तिला आपोआप ओलसरपणा येतो. उघड्या हवेतही तिला ओलसरपणा येतो. साखरेला ओलसरपणा येऊ नये म्हणून ती सर्वसामान्य तापमानाला हवा बंद डब्यात ठेवावी.


७) गरम सॉस : आपल्या गरम सॉसला सर्वसामान्य तापमानावर ठेवल्यास ते खराब होईल अशी भीती बाळगू नका. या तापमानाला तो तीन वर्षापर्यंत सुरक्षित राहू शकतो. हा सॉस फ्रिजमध्ये ठेवण्याची काहीही आवश्यकता नाही.


८) टोमॅटो : टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवणे आपल्याला सर्वसाधारण बाब वाटेल, परंतु त्यामुळे टोमॅटोची चव कमी होते. त्यामळे टोमॅटो सरळ आपल्या स्वयंपाकघराच्या काउंटरवर परंतु पसरून ठेवा ज्यामुळे त्यांची चव कायम राहील आणि ते खराब होणार नाहीत.


९) कच्चे मांस : कच्चे मांस फ्रिजच्या वरच्या भागात ठेवू नका. जरी ते लवकर खराब होत असले तरी त्याच्यामुळे इतर पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून ते फ्रीजच्या सर्वात खालच्या शेल्फवर ठेवणे चांगले असते.


१०) ऑलिव्ह ऑईल : सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरातील गॅस शेगडीच्या जवळपास काचेच्या बाटलीत ऑलिव्ह ऑइल ठेवलेलं दिसते. परंतु ते तेल उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे जलद ऑक्सिडाईझ होते आणि त्यामुळे त्याची चव कमी होते. उष्ण ठिकाणापासून ते दूर ठेवा.


११) अवाकाडो : अवाकाडो पिकण्याच्या मार्गावर असले तरी ते फ्रिजमध्ये ठेवू नका. ते खोलीच्या सर्वसामान्य तापमानात ठेवा. आपल्याला जर ते लवकर पिकवायचे असेल तर तपकिरी रंगाच्या पिशवीत भरून खिडकीत ठेवा. अवाकाडोला तपकिरी रंग येऊ नये म्हणून त्यात लिंबू कापून ठेवा.


१२) कांदे आणि लसूण : स्वयंपाकघरात जाळीच्या टोपलीत कांदे आणि लसूण साठवून ठेवणे हा योग्य मार्ग आहे. त्यांना खेळती हवा मिळाली तर त्यांचे आयुष्य वाढते, त्यामुळे ते फ्रिजमध्ये ठेवू नका.
आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.