Wednesday, 4 March 2020

सर्दी झाल्यावर नाक शिंकरणं आरोग्यास अपायकारक ?? वाचा त्यामागचं शास्त्रीय कारण !!



लहानपणी नाक स्वच्छ नसल्यामुळे किंवा नाक गळत असल्यापायी तुम्ही आईचा ओरडा खाल्ला असेल. सर्दी झाल्यावर कफ साफ करण्यासाठी आपण नाक जोरात शिंकरतो. पण भाऊ, काही वर्षांपूर्वी झालेल्या संशोधनातून नाक शिंकरणं आरोग्यासाठी चक्क हानीकारक असतं असं निदर्शनास आलंय!! पण यामागचं शास्त्रीय कारण काय. तेच आपण आजच्या लेखातून जाणून घेऊया......


कारण काय???

नाक जोरात शिंकरून स्वच्छ का करू नये याला बरीच कारणं आहेत. त्यातली काही बघूया....
१) आपल्याला सर्दी होते, तेव्हा आपल्या नाकातील लहान रक्तवाहिन्या सुजतात. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असं निष्पन्न झालं आहे की नाक जोरात शिंकरल्याने नाकातील ह्या रक्तवाहिन्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होऊ शकते. तसंच एका केसमधे एका स्त्रीच्या डोळ्याच्या खोबण्यांनासुद्धा हानी झाली होती.

२) आपल्या शरीरातील कान व नाक हे दोन्ही अवयव परस्परांशी जोडलेले असतात. नाक जोरात शिंकरल्याने कानाच्या पडद्यावर ताण येतो. हा ताण जर एका मर्यादेपलीकडे गेला, तर कानाचा पडदा फाटून बहिरेपण येऊ शकतं.

मग उपाय काय???


प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्यूशन तर असतंच !!


१) वाफारा हा या प्रॉब्लेमवरचा सर्वात उत्तम उपाय आहे. एका पातेल्यात उकळतं पाणी घेऊन त्यावर तोंड धरावं. डोक्यावरून एखादं कापड घ्यावं. यामुळे कफ पातळ होऊन निघून जाण्यास मदत होते.

२) नाक शिंकरताना एक नाकपुडी बंद करून नाक शिंकरावं. ह्यामुळे निर्माण झालेल्या ताणाची पातळी कमी असते.

३) ॲलोपॅथिक गोळ्यांनी व औषधांनीसुद्धा हा प्रॉब्लेम आटोक्यात आणता येतो. पण ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

हे उपाय आपल्याला परिणामकारक वाटले का हे आम्हाला जरूर कळवा!!!

No comments:

Post a Comment