तुमच्या तोंडाचा वास येतो का ? लाजू नका राव. ही अनेकांची समस्या आहे. कितीही दात घासले किंवा माऊथवॉशचा वापर केला तरी हा दुर्गंध जात नाही. मुळात हा वास असतो श्वासाचा. या दुर्गंधीची अनेक करणं देता येतील. जसे की तोंडात पुरेशी लाळ न तयार होणे, अन्नाचे कण दातात अडकणे, पुरेसे पाणी न पिणो, वगैरे वगैरे.
करणं खूप असली तरी काही मोजक्या उपायांनी तुमच्या तोंडाची दुर्गंधी झटक्यात कमी होऊ शकते. चला हे रामबाण उपाय जाणून घेऊया.
१. तोंडाचा वास घालवण्यासाठी दातांची स्वच्छता अत्यंत गरजेची असते. तुमचा टूथब्रश दर २ ते ३ महिन्यांनी बदलायला विसरू नका. याचं शास्त्रीय कारण जाणून घेण्यासाठी आमचा खालील लेख वाचा.
२. भरपूर पाणी प्या. पाण्याने तोंडाची दुर्गंधी बऱ्याच प्रमाणात कमी होते. जमल्यास प्रत्येक २ तासांनी थंड पाण्याने गुळण्या करा.
३. दातांची स्वच्छता राखताना जिभेला विसरू नका. जीभेवरही बॅक्टेरिया जमा झालेले असतात. हल्ली तर प्रत्येक टूथब्रशच्या मागे जीभ घासण्यासाठी ‘स्क्रॅपर’ असतो. या ‘स्क्रॅपर’चा नियमित वापर करा.
४. दातांमध्ये अडकलेल्या अन्नामुळे बऱ्याचदा हा दुर्गंध येत असतो. हे अन्नाचे कण नैसर्गिकरीत्या निघून जावेत यासाठी सतत लाळ तयार होणे गरजेचे असते. लाळेमुळे तोंडातील बॅक्टेरियाची वाढही थांबते. जास्तीत जास्त लाळ तयार होण्यासाठी सफरचंद सारखी फळं खाणे किंवा च्विंगम चावणे फायदेशीर ठरू शकते.
५. शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे डेंटल चेकअपपासून दूर पळू नका. कारण दातांची कीड किंवा हिरड्यांच्या आजारामुळे हा दुर्गंध येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी वर दिलेले सगळे उपाय फोल ठरतील. त्यामुळे असे आजार असतील तर वेळोवेळी दातांची तपासणी करून घ्या.
No comments:
Post a Comment