Friday, 6 March 2020

सततच्या पिंपल्स येण्याने त्रस्त होत असताल तर हे सोपे उपाय करून बघा !!


पिंपल्स येणे हि आजकाल तारुण्यातील एक कॉमन समस्या होऊन गेली आहे. पिंपल्स येण्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आजकाल प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पिंपल्स हे कोणत्याही वयात यायला लागले आहेत. पिम्पल्सने आपले सौंदर्य बिघडते. अनेकदा आपण पिंपल्स लपवण्यासाठी अनेक गोष्टी करून बघतो. पिम्पल्सने अक्षरशः चेहरा झाकण्याची वेळ अनेकदा येऊ शकते.

पिंपल्स हे आपोआप जातात असा आपला समज असतो. पण पिम्पल्सवर वेळेत उपचार करणे देखील महत्वाचे आहे. कारण वेळेत उपाय नाही केले तर त्याचे चेहऱ्यावर काळे डाग देखील पडू शकतात.

पिंपल्स दूर करण्यासाठी बाजारात अनेक ब्युटी प्रोडक्ट उपलब्ध आहेत. पण त्यामध्ये होत असलेला केमिकलचा वापर हा आपल्या चेहऱ्यासाठी नुकसान करणारा ठरू शकतो. पिंपल्स दुर करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. जाणून घेऊयात खासरेवर..
त्वचेची स्वच्छता राखा-

त्वचेवर आपल्या भरपूर छिद्र असतात. त्वचेवर प्रदूषणामुळे धूळ आणि घाण चिटकून राहते. त्यामुळे त्वचेची स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे.
पिम्पल्सच्या चांगल्या क्रीम देखील आहेत उपलब्ध-

पिंपल्सचा आकार मोठा असेल तर त्यावर वेळीच उपचार घेणे कधीही चांगले. बाजारात उपलब्ध असलेल्या अँटी ऍक्ने क्रीम घेऊन या. या क्रिमची निवड तुमच्या स्किन टाइपनुसारच हवी. जर ही क्रिम तुमच्या त्वचेला सूट करत नसेल तर वापर करू नये.
पिंपल्ससाठी एस्प्रिन गोळी-

चेहऱ्यावर फार जास्त पिंपल्स आले असतील तर एस्प्रिनची टॅबलेट बारिक करून पिंपल्सवर लावा. याने फायदा होईल. पण यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
खोबऱ्याचं तेल आणि टी ट्री ऑइल-

त्वचेची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी खोबऱ्याचे तेल देखील खूप उपयोगाचे आहे. खोबऱ्याचं तेल आणि टी ट्री ऑइलचा एकत्र वापरही अधिक फायदेशीर ठरू शकतो. हे दोन्ही एकत्र करून कॉटनच्या मदतीने ते रात्रभर पिंपल्सला लावून ठेवा.दोन ते तीन आठवड्यात तुम्हाला पिंपल्सपासून सुटका मिळेल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

No comments:

Post a Comment