Thursday 5 March 2020

हिरव्या मिरचीला कधीही नाही म्हणू नका, हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी आहेत हे १० फायदे !!


आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. जास्त तिखट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते अशी एक समजूत आपल्याकडे आहे. तुम्ही या समजुतीमुळे हिरवी मिरची खाणे टाळत असाल तर आता असे करू नका.
कारण हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी असणारे फायदे वाचले तर आपण उगाच तिला टाळत आलो असे तुम्हाला वाटेल. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत नेमके हिरव्या मिरचीच्या सेवनाचे फायदे…


१) हिरव्या मिरची ही व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C, लोह, पोटॅशिअम सोबतच कार्बोहायड्रेट्स सारख्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक पोषकतत्वांचा उत्तम स्रोत आहे.


२) बीटा कॅरेटिन, क्रिप्टोक्सान्थिन, लुटेन जॉक्सन्थिन असे घटकही हिरव्या मिरचीत मुबलक प्रमाणात आढळून येतात. 


३) मधुमेह सारख्या गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या लोकांनी आपल्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश आवर्जून करायला हवा. हिरव्या मिरचीच्या सेवनाने शरीरात असणाऱ्या शर्करेची पातळी नियंत्रित राहायला मदत होते.


४) हिरव्या मिरचीत आढळून येणारे व्हिटॅमिन्स त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. तुम्ही जर हिरव्या मिरचीचे सेवन केले तर तुमची त्वचा उजळायला मदत होते. याव्यतिरिक्त हिरव्या मिरचीचा एक चमचा रस मधामध्ये घालून अनाशेपोटी खाल्ल्यास दम्याच्या आजारात आराम मिळेल.


५) हिरवी मिरची खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते. 


६) हिरव्या मिरचीत असणारे व्हिटॅमिन C जेवणानंतर शरीरात लाळ निर्माण करण्यासाठी मदत करते, त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते.


७) हिरवी मिरची शरीरातील चरबी कमी करून शरीरातील चयापचय क्रिया वाढवण्यास मदत करते. हिरवी मिरची एक उत्तम अँटी ऑक्सिडेन्ट आहे. 


८) हिरव्या मिरचीत असणाऱ्या व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.


९) हिरव्या मिरचीत असणाऱ्या Capsaicin नावाच्या घटकामुळे प्रोस्ट्रेट कॅन्सरचा धोका कमी होतो. त्यासोबतच चेहऱ्यावर येणारे पिंपल्स कमी होण्यासही मदत होते. 


१०) हिरव्या मिरचीत प्रतिजैविकांचाही गुणधर्म आढळून येतो, त्यामुळे शरीर निर्जंतुक राहण्यास मदत होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

No comments:

Post a Comment