Monday 2 March 2020

ह्या बॉलीवुड अभिनेत्रीने घेतला बुर्ज खलिफा मध्ये फ्लॅट !!


जगातील सर्वात उंच इमारत म्हणून बुर्ज खलिफाची ओळख आहे. ह्याच टॉवरमध्ये आपले उंच भागी घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. शर्लिन चोपडा ह्या बॉलीवुड अभिनेत्रीने आपली ही इच्छा पूर्ण केली आहे. जगातील सर्वात उंच टॉवर मध्ये फ्लॅट विकत घेतला आहे. शर्लिन आपल्या बोल्डणेस साठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आपल्या वयक्तिक आयुष्यात सुद्धा ती चांगल्या स्थरावर आहे. सिनेमा, वेब सिरीज आणि मॉडेलिंग द्वारे तिची कमाई होत असते.
टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना शर्लिन ने हे कन्फर्म केलं आहे मी तिने बुर्ज खलिफा मध्ये फ्लॅट विकत घेतला आहे. दुबई मध्ये माझ्या एका मित्राने मला सांगितले की इथल्या रिअल इस्टेट मध्ये पैसा गुंतव त्यामुळे मी एवढं मोठं पाऊल उचललं. माझे नेहमीपासून एक स्वप्न आहे की मी जिथे जाईन तिथे माझे घर असावं आणि ह्यात मला दुबई खूप आवडते आणि माझ्या नवीन फ्लॅटची सुरुवात इथून होतेय त्यामुळे मी खूप आनंदी आहे.
शर्लिन चोपडा ने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. असे सांगण्यात येत आहे की हे फोटो ह्याच तिच्या फ्लॅट मधील आहेत. तुम्हीही जाऊन आवर्जून पाहू शकता.

No comments:

Post a Comment