असे म्हटले जाते की ज्याला रात्री सुखाची झोप लागते तीच व्यक्ती जगात सर्व आनंदी असते. परंतु आजकालच्या दिवसभराच्या धावपळीच्या जगात थकून भागून घरी आलेल्या लोकांना सुखाची झोप लागणे अवघड होऊन बसले आहे.
बहुतांश लोकांची अशी तक्रार असते की, बिछान्यावर पडल्यानंतरही बराच वेळपर्यंत त्यांना झोप येत नाही. मन अशांत राहते आणि कूस बदलण्यातच रात्र निघून जाते. काली करू नका, अमेरिकन सैन्याने झोप न येण्याच्या समस्येवर एक उपाय शोधून काढला आहे. या उपायामुळे २ मिनिटात झोप येईल. त्यासाठी थोडा सर्व करावा लागेल.
कसा शोधला सैन्यदलाने हा उपाय ?
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन लढाऊ विमानांचे पायलट्स निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त झाले होते. ही गोष्ट लक्षात घेऊन अमेरिकन नेव्ही परी-फ्लाईट स्कुलच्या एका वैज्ञानिकाने यावर एक उपाय शोधला. हा उपाय जरी वैमानिकांसाठी शोधला असला तरी निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त असणाऱ्या सर्वसामान्य लोकांनाही हा उपाय दैनंदिन जीवनात वापरता येऊ शकतो. “रिलॅक्स अँड विन : चॅम्पियनशिप परफॉर्मन्स” या पुस्तकात हा उपाय देण्यात आला आहे. अमेरिकेच्या ९६% पायलट्सना याचा फायदा झाला.
काय आहे हा उपाय ?
बिछान्यावर झोपल्यानंतर सर्वप्रथम आपले डोळे बंद करा आणि आपले लक्ष चेहऱ्यावर केंद्रित करा. हळूहळू आणि खोल श्वासोच्छ्वास सुरू करा. श्वास बाहेर सोडताना आपले गालावर लक्ष केंद्रित करा. तोंड, जीभ आणि जबडा सैल सोडा. डोळेही सैल सोडा. डोळ्यांच्या खोलपणावर लक्ष केंद्रित करा.
यामुळे आपल्या शरीराला सिग्नल मिळेल की आता विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. आता हळू हळू आपले खांदे सैल करा. गळ्याच्या मागच्या बाजूला आराम द्या.
आपले हात सैल सोडत असताना आता आपल्या उजव्या हाताकडे लक्ष द्या. उजवा दंड हळूवारपणे सैल सोडा. डाव्या हातासोबतही हीच क्रिया करा. हळूवारपणे हाताच्या बोटांनाही विश्रांती द्या. हात झाल्यानंतर पायावर लक्ष केंद्रित करा. उजव्या पायाची मांडी, पोटरी आणि बोटांना आराम द्या. आता डाव्या पायाबाबतही हीच कृती करा. आता या मार्गाने आपल्या चेहऱ्यापासून पायापर्यंतच्या सर्व स्नायूंना आराम मिळाला आहे. कसलाही ताण राहिला नाही.
संपूर्ण शरीर सैल सोडल्यानंतर आपले लक्ष मनावर केंद्रित करा. पुढील १० सेकंद मनाला पूर्णपणे शांत करा. जसे काही चारी बाजूला अंधारच आहे, काहीच दिसत नाही असा विचार करा. दुसर्या कशाचाही विचार मनात आणू नका. दिवसभर काय घडले आणि काय नाही घडले याचा विचार करू नका.
आता असा विचार करा की आपण एका अंधाऱ्या खोलीत आहात. आतापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये आपल्या शरीराचा प्रत्येक स्नायू सैल झाला आहे. डोळ्यांसमोर काहीही नाही, मन देखील पूर्णपणे शांत आहे. कुठूनही कसलाही आवाज येत नाही. फक्त तुम्ही आणि तुमचे शांत पडलेले शरीर आहे. विश्वास ठेवा तुम्हाला झोप लागलेली असेल…
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.
No comments:
Post a Comment