Monday 2 March 2020

तुमच्या शरीराला सुद्धा येतोय नेहमी घामाचा वास तर करा हे तीन उपाय

काही लोकांना खूप जास्त घाम येण्याचा त्रास असतो. अशा व्यक्तींना उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा असला तरीसुद्धा कधीही घाम येऊ शकतो. हा त्रास एवढा असतो की कुठेही त्यांच्या शरीराला हवी तेवढा वारा मिळाला नाही तर लगेच घाम यायला सुरुवात येते. काहींना ह्याच त्रासामुळे मोठ्या समस्या निर्माण होतात कारण ह्या घामाचा वास येत राहतो. आणि असे झाल्याने मन अस्वस्थ होत. कशात मन लागत नाही. आज आम्ही तुम्हाला ह्याच गोष्टीवर काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर त्या समस्येचे निराकरण होईल.
अंघोळ करून तुम्ही बाहेर आल्यानंतर शरीरावर टेलकम पावडर चा वापर करा. ही पावडर घामाला सोसून घेते त्यामुळे घाम जास्त येत नाही आणि त्याचा वास ही जाणवत नाही.
घामाच्या वासापासून वाचण्यासाठी अंघोळ करताना आपल्या अंघोळीच्या पाण्यात यूडीकॉलोन, लैवेंडर किंवा लिंबुचे रस टाकणे किंवा डेटॉल, गुलाब जलाची काही थेंब पाण्यात टाकणे. ह्यानुळे तुमचे शरीर फ्रेश राहील आणि घाम येणार नाही.
अंघोळीच्या पाण्यात टोमॅटो चा रस गाळून टाका आणि ह्याच बरोबर तुम्ही टोमॅटोचा ज्युस पण पिऊ शकता. ह्यामुळे घामाचा वास नाही येणार.
आम्ही सांगितले हे घरगुती उपाय आहे. एकदा नक्कीच प्रयत्न करा फरक जाणवेल. तुम्हाला अजुन अशाच प्रकारच्या हेल्थ, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचायची आवड असेल तर आपल्या ह्या पेजवर नेहमी भेट देत रहा.

No comments:

Post a Comment