फक्त जखम झाल्यावर किंवा चुकीच्या औषधींमुळेच मेंदूला नुकसान पोहोचते असे नाही तर दिवसभराच्या धावपळीत आपण अशा चुका करतो ज्याचा आपल्या मेंदूवर वाईट प्रभाव पडतो.
जाणून घेऊया अशाच काही सवयी ज्यांच्यामुळे मेंदूला नुकसान होऊ शकते..
पुरेशी झोप न घेणे :
कमीत कमी ७ तासांची पुरेशी झोप घेतली नाही तर मेंदूला व्यवस्थित आराम मिळत नाही. त्यामुळे मेंदूवर वाईट प्रभाव पडू शकतो. परिणामी काळानुसार मेंदूची काम करण्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते.
बराच काळ एकाकी राहणे :
जास्त काळ एकाकी राहणे हे देखील मेंदूच्या आरोग्यासाठी चांगली बाब नाही. एकटेपणाचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. तसेच भविष्यात अल्झायमरचा धोका होण्याचीही मोठी शक्यता असते.
जंक फूडचा अति प्रमाणात वापर :
जंक फुडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्याचा मेंदूच्या न्यूरॉन रिसेप्टरला धोका होऊ शकतो. असे जंक फूड अति प्रमाणात खाल्ल्यास डोकेदुखी, बेचैनी, उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
मोठ्या आवाजात गाणी ऐकणे :
सतत तासनतास कानात हेडफोन किंवा इअरफोन लावून मोठया आवाजात गाणी ऐकल्यास त्या आवाजाचा मेंदूच्या टिश्यूजवर घातक परिणाम होतो आणि त्यामुळे अल्झायमरचा धोका होऊ शकतो.
क्रियाशील न राहणे :
नियमित कोणताही शारीरिक क्रिया न केल्यास माणसाचे शरीर मधुमेह, हृदय विकार आणि उच्च रक्तदाब यासारख्या रोगांना बळी पडू शकते. या रोगांचा मेंदूवर वाईट परिणाम होतो.
स्मोकिंग :
स्मोकिंग करत असताना आपल्या रक्तात घातक रासायनिक घटक जातात. परिणामी आपले रक्त घट्ट बनते. त्यामुळे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो आणि त्याचा मेंदूवर घातक परिणाम सुद्धा होतो.
अति आहार :
अति आहाराचा थेट मेंदूशी संबंध येतो. अति आहार करण्याने माणसाच्या शरीरातील ऊर्जा खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्यासाठी खर्ची पडते आणि माणसाच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते.
नैसर्गिक प्रकाशात न राहणे :
जास्त काळ अंधारात राहिल्यास किंवा नैसर्गिक प्रकाशात खूप कमी राहिल्यास माणसामध्ये एकप्रकारचे डिप्रेशन वाढत जाते. त्याचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. नैसर्गिक प्रकाशात राहिल्यास मेंदूला विचार करण्यास चालना मिळते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.
No comments:
Post a Comment