इंटरनेटच्या ह्या जगात कोण कधी कोणत्या पद्धतीने वायरल होऊन प्रसिद्ध होईल हे आपण सांगू शकत नाही. आजवर अनेक अशी उदाहरणे तुम्ही पाहिली असतील ह्यात रातोरात त्या व्यक्ती प्रसिद्ध झाली आहेत. ह्याच लिस्ट मध्ये अजुन एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे डिलिव्हरी बॉय सोनू. इंटरनेवरील प्रांतात तुम्ही जर फिरत असाल तर हे नाव नक्कीच तुम्हाला नवीन नाही. आपल्या एका व्हिडिओ ने संपूर्ण भारतात त्याने आपल्या स्माईल ने प्रसिद्धी मिळवली आहे.
आपल्या त्याच स्माईल व्हिडिओ मुले इंटरनेटवर सेंसेशन बनला आहे. झोमैटो मध्ये काम करणाऱ्या ह्या कामगाराने स्वतःचे आणि झोमैटो कंपनीचे नाव सुद्धा उज्ज्वल केले आहे. प्रत्येकजण त्याच्या व्हिडिओ बद्दल बोलत आहेत, लोक आवर्जून शेअर करत आहेत. काहींनी तर भन्नाट भन्नाट मिम्स तयार करून ह्या भाऊंना भारतीय क्रश घोषित करा म्हणून मागणी केली आहे. आपण झोमैटो वरून ३५० रुपये दिवसाला कमवतो तरीही आपण खूप खुश आहोत असे त्याने निरागस पद्धतीने स्माईल करत ह्या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.
झोमैटो इंडिया ने सुद्धा आपल्या सोशल मीडियावरून सोनू ची व्हिडिओ शेअर करत त्याला प्रोत्साहन केलं आहे. आपल्या प्रोफाइल फोटोवर सुद्धा सोनुचा फोटो त्यांनी लावला आहे. ह्यातच दुग्धशर्करा योग म्हणावं की काय तर Lays कंपनीने सुद्धा आपल्या Lays पॉकेटवर सोनूची स्माईल करत असलेली फोटो छापली आहे. अनेक लोक हा पॉकेट विकत घेऊन त्या सोबत सेल्फी काढून पोस्ट करत आहेत.
प्रसिद्धी मिळावी असे प्रत्येकाला वाटत असते पण सर्वानाच ती मिळते असे नाही. पण ज्यांना मिळते ते कधी त्याचा गैरवापर करतात तर काही लोक आयुष्यभर जपतात.
No comments:
Post a Comment