Monday 2 March 2020

द अंडरटेकर बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला कदाचित माहीत नसतील....

WWE म्हटलं की आपल्या भुवय्या नेहमीच उंचावतात. ह्यामध्ये आपले अनेक आवडते रेसलर आहेत ज्यांना फाईट करताना बघताना नेहमीच आपल्याला मज्जा येते. ह्यातले च एक नाव म्हणजे अंडरटेकर. WWF मध्ये आपल्या नावाचा नेहमीच डंका प्रस्थापित करणारा अंडरटेकर ह्याने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. जेव्हा त्याची एन्ट्री व्हायची तेव्हा ती एकदम धासू असायची. बरेच लोक त्याची एन्ट्री पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये गर्दी करायचे.
सध्या अंडरटेकर WWE पासून लांब असले तरीसुद्धा त्याचा चाहतावर्ग तिळमात्र कमी झालेला नाही. म्हणुनच आज आम्ही तुम्हाला द अंडरटेकर ह्यांच्याबद्द्दल अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुमच्या माहितीच्या परे असतील.
६.१० इंच असलेल्या अंडर टेकर चे खरे नाव मार्क विलियम कैलावे आहे. त्याचा जन्म २४ मार्च १९६५ मध्ये हॉस्टन, टेक्सस US मध्ये झाला.
तुम्हाला हे माहित नसेल की अंडरटेकरने आपल्या वयक्तिक आयुष्यात तीन लग्न केली आहेत. पहिले लग्न जोडी लीन सोबत १९८९ मध्ये केलं होत. दुसरे लग्न १९९९ मध्ये सारा सोबत केले होते तर तिसरे लग्न मिशेल मैककूल सोबत केले आहे. हीच्यासोबत सध्या संसार सुरू आहे.
अंडरटेकरला तीन मुली आहेत. ग्रेसी, चैसी आणि किया आणि त्याला एक मुलगा सुद्धा आहे त्याच नाव गनर विन्सेंट आहे.
तीनवेळा अंडरटेकर वर्ल्ड हैवीवेट चैंपियन, सहावेळा WWF वर्ल्ड टैग टीम चैंपियन, WWF वर्ल्ड हैवीवेट चैंपियन, आणि एकवेळा रॉयल रंबल विजेता झाला आहे.
रेसलर बनण्या अगोदर अंडरटेकर १९८५ ते १९८६ ह्या काळात बास्केटबाल प्लेयर राहिले आहेत.

No comments:

Post a Comment