Friday 6 March 2020

सिक्स पॅकच्या मोहापायी मूत्रपिंड होऊ शकते निकामी !!



आपले शरीर बलदंड दिसावे असे कुठल्या तरुणाला वाटणार नाही. सिनेमातील हिरो लोकांची बॉडी पाहून सिक्स पॅक बनवण्यासाठी जीम जॉईन करणाऱ्या तरुणांची संख्या जशी वाढत आहे, तशीच जीमची संख्यादेखील वाढत आहे.


ध्येय एकच, काही करून स्टील बॉडी बनवायची आहे. मग त्यासाठी कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय स्टिरॉइड्स किंवा प्रोटीन सेवन करतील. परंतु हेच सेवन त्यांच्या शरीरासाठी किती घातक असू शकते याबद्दल त्यांना जराशीही कल्पना नसते. याच दुर्लक्षितपणामुळे मूत्रपिंड गमावण्याची दोन तरुणावर आली आहे.

व्यायामाबद्दल आवड असणे चांगली गोष्ट आहे. जीममध्ये जाणेही वाईट नाही. जीममध्ये तरुणांना लवकर रिझल्ट मिळवण्यासाठी सप्लिमेंट्री खाद्य सुरु करण्यास सांगितले जाते.
परंतु कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय एनाबोलिक स्टेरॉइड्स, ग्रोथ हार्मोन्स, हाई प्रोटिन डाएट, क्रिएटिन किंवा व्हे प्रोटिनचा अतिरिक्त वापर केल्यास शरीरासाठी महागात पडण्याची शक्यता असते असे संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. तरुणांच्या बेजबाबदारपणामुळे सप्लिमेंट्स विक्री करणारे बक्कळ पैसे कमावतात, पण याच तरुणांना स्वतःच्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
सप्लिमेंट्समुळे होऊ शकतो मूत्रपिंडाचा आजार

सौदी जर्नल ऑफ किडनी डिसिजेस अँड ट्रान्सप्लांटच्या अभ्यासानुसार जे लोक स्टेरॉइड्स घेतात, त्यांच्यामध्ये तिसऱ्या किंवा पाचव्या स्तरावर असाध्य असा किडनीचा विकार होण्याची शक्यता जास्त आढळते. त्याचा प्रजननसंस्थेवरही घातक परिणाम होऊ शकतो.

हृदय रोग, मानसिक रोग, यकृताचे रोग असे वेगवगेळे रोगही होउ शकतात. प्रत्येकाच्या शरीराची रचना, त्याचे अनुवांशिक आजार किंवा क्षमता वेगवगेळी असते, त्यामुळे एखाद्या चांगल्या तज्ञ मार्गदर्शकाच्या सूचनेनुसारच सप्लिमेंट्सचे सेवन करणे आवश्यक आहे.

दोन तरुणांचे मूत्रपिंड निकामी
औरंगाबाद शहरात दोन युवकांना याच सप्लिमेंट्स सेवनाचा फटका बसला आहे. त्यापैकी पहिला तरुण रोजच्या ४० अंड्यातून मिळणाऱ्या प्रोटीन व्यतिरिक्त बाहेरूनही जादा प्रोटीन सेवन करत होता. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याच्या दोन्ही मूत्रपिंडाचे कार्य थांबले असल्याचे सांगितले.

त्याच्यावर योग्य ते उपचार आणि आवश्यक त्या आहाराने पुन्हा त्याचे कार्य पूर्ववत करण्यात आले. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये अशाच एका बॉडी बिल्डरला मूत्रपिंड निकामी झाल्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

No comments:

Post a Comment