तुम्हाला कधी डास चावले आहेत का ? किती मूर्खपणाचा प्रश्न आहे. डासापासून भले कोण वाचलं असणार ? कधीकधी असे वाटते की हे डास डासांनाही चावत असतील. सवयच असते त्यांना चावायची. पण एखादा माणूस असा असतो ज्याला डास जास्तच चावत असतात, त्यामागे बरीच कारणे आहेत.
जगात काहीही विनाकारण होत नाही. आज आम्ही सांगणार आहोत तुम्हाला डास जास्त का चावतात…
जास्त डास चावण्यामागची खरी कारणे:
१) जर आपले रक्त गोड असेल तर डास आपल्याला जास्त चावतात. बऱ्याचदा आपल्याला असे ऐकायला मिळाले असेल. परंतु खरं कारण हे आहे की, ‘O’ रक्तगटाकडे डास जास्त प्रमाणात आकर्षित होतात. या रक्तगटामध्ये असणारे काही विशेष घटक डासांना आकर्षित करतात.
२) आपल्या त्वचेमध्ये लॅक्टिक ऍसिड आढळते. जर त्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर डासांची पर्वणीच झाली म्हणून समजा, म्हणजेच जास्त डास चावतील.
३) शरीराचे तापमानदेखील जास्त डास चावण्यामागचे एक मोठे कारण आहे. व्यायाम करताना शरीराचे तापमान वाढते, म्हणूनच व्यायामानंतर अधिक डास चावतात.
४) आपल्या योग शिक्षकाने आपल्याला दीर्घ श्वास घ्यायला सांगितले असेल. पण ते डासांसाठीच जास्त फायद्याचे असते. कारण जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो तेव्हा सोडतो देखील जास्त. शरीरातून कार्बनडायऑक्साईड बाहेर सोडताना त्यात आपल्या शरीराचा गंध मिसळलेला असतो. त्यावरूनच डास कोणत्या शरीराला शिकार करायचे आहेत हे ठरवतात. दीर्घ श्वास डासांना अनुमान लावण्यासाठी उपयुक्त ठरतात.
५) गर्भवती महिलांनाही डास जास्त चावतात. वास्तविक गर्भवती महिलांचे तापमान इतर स्त्रियांपेक्षा जास्त असते म्हणून डास त्यांना जास्त डास चावतात.
६) अमेरिकन डास नियंत्रण असोसिएशनच्या म्हणण्यानुसार जगात ३००० हून अधिक डासांच्या प्रजाती आहेत. त्यातील कित्येक डास तर इतके घातक आहेत की माणसाचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते.
७) नर डास चावत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. केवळ मादी डास चावतात. आपल्या शरीराच्या रक्तामुळे मादी डासांची अंडी जलद तयार होतात. म्हणजेच डासांची पैदास वाढणे ही आपल्या शरीरातील रक्ताचीच कमाल आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.
No comments:
Post a Comment