बाप होणे ही प्रत्येक पुरुषासाठी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट असते. पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बाप झाला आहे. ह्या अगोदर त्याला चार मुली आहेत आणि आता त्याच्या पत्नीने पाचव्या मुलीला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी आफ्रिदीने आपल्याला चाहत्यांना सोशल नेटवर्कवरून दिली आहे. त्याने पोस्ट करताना असे लिहीले “अल्लाहचे माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यांनी आधीच माझ्या पदरात चार मुली दिल्या आहेत आणि आता पाचव्या मुलीचा जन्म झाला आहे. ही माझ्या आयुष्यातील सर्वात गोड बातमी माझ्या चाहत्यांना देत आहे.
ह्या फोटोमध्ये आफ्रिदीच्या चारही मुली त्याच्या आजूबाजूला आहेत आणि त्याची नवजात मुलगी त्याच्या हातात आहे. अजवा अक्शा अनशा आणि असमारा अशी त्याच्या चार मुलींचे नावे आहेत. नवीन जन्मलेल्या मुलीचे नामकरण अजुन केले नाहीये. तुमच्या माहिती साठी शहीद आफ्रिदीचे लग्न २१ ऑक्टोंबर २००० मध्ये नादिया सोबत झाले आहे. ह्या बातमी मुले अनेक क्रिकेटर आणि चाहते शाहिदला शुभेच्छा देत आहेत.
आफ्रिदीने आतापर्यंत २७ टेस्ट, ३९८ एकदिवसीय सामने, ९९ टी ट्वेण्टी, ११३ फर्स्ट क्लास सामने, ५०१ लिस्ट ए सामने खेळले आहेत. आफ्रिदीने पूर्ण नाव साहिब जादा मोहमद शाहिद खान आफ्रिदी आहे. सध्या त्याने क्रिकेट मधून सन्यास घेतला असला तरी लीग सामने खेळताना आपल्याला आफ्रिदी पाहायला मिळतो. ह्यात मुलतान सुलतान आणि ढाका पल्टन संघाचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment