Thursday 5 March 2020

चुकीच्या पद्धतीने आपण साठवत असलेले १२ खाद्यपदार्थ


कधीकधी, आपण आपल्या मनानेच घरातील अन्नपदार्थांची साठवण करत असतो, कारण आपल्याला कुणीतरी तसेच शिकवलेले असते. परंतु कधीकधी आपले अन्नपदार्थ चुकीच्या ठिकाणी साठवण्याने ते लवकर खराब होतात त्यांच्या चवीवरही परिणाम होतो.

१) कॉफी बीन्स : आपली कॉफीचे फ्रिजमध्ये ठेवू नका. फ्रीजमध्ये ठेवल्याने तिची चव कमी होते, तसेच कॉफी आर्द्र बनते; त्यामुळे आपल्या कॉफीचा स्वाद बिघडतो. त्याऐवजी कॉफी बॅग, कॅन किंवा सीलबंद जारमध्ये काउंटरवर ठेवा.


२) सफरचंद : घरी येणाऱ्या अतिथींना आपल्या स्वयंपाकघरातील काउंटरवरचा सफरचंदांचा एक गुलाबी वाडगा दाखवण्याचा मोह आपल्याला होतो. परंतु तोच वाडगा फ्रीजमध्ये ठेवल्यास सफरचंदाचे आयुष्य वाढू शकते. त्यांना प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवल्यास ती लवकर खराब होत नाहीत.


३) औषधी वनस्पती आणि मसाले : बरेच लोक आपले कोरडे मसाले आणि औषधी वनस्पती फ्रिजमध्ये किंवा स्वयंपाकाच्या शेगडीच्या वर फळीवर ठेवतात. ओलावा, उष्णता आणि प्रकाशामुळे या मसाल्यांना तेल सुटू शकत, ज्यामुळे त्यांचा फ्लेवर कमी होऊ शकतो. त्यापेक्षा मसाले बरणीत भरुन कपाटात ठेवा.


४) दाणे : माफ करा, पण ड्रायफ्रूट्स किंवा दाणे हे काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ उघड्या वातावरणात चांगले राहू शकत नाहीत. अक्रोड, काजू आणि बदामांसारखे ड्रायफ्रूट्स फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे, जिथे ते नऊ महिने टिकतील.


५) मेपल सिरप : बर्‍याच लोकांना असे वाटते की शुद्ध आणि कृत्रिम मेपल सिरप साठवण्यासाठी एकसारख्याच साठवणपद्धती वापरतात. परंतु सहा महिन्यांची एक्सपायरी डेट असणारे शुद्ध मेपल सिरप फ्रिजमध्ये ठेवणे महत्वाचे आहे.

६) ब्राऊन साखर : आपली ब्राऊन शुगर फ्रिजमध्ये ठेवल्यास तिला आपोआप ओलसरपणा येतो. उघड्या हवेतही तिला ओलसरपणा येतो. साखरेला ओलसरपणा येऊ नये म्हणून ती सर्वसामान्य तापमानाला हवा बंद डब्यात ठेवावी.


७) गरम सॉस : आपल्या गरम सॉसला सर्वसामान्य तापमानावर ठेवल्यास ते खराब होईल अशी भीती बाळगू नका. या तापमानाला तो तीन वर्षापर्यंत सुरक्षित राहू शकतो. हा सॉस फ्रिजमध्ये ठेवण्याची काहीही आवश्यकता नाही.


८) टोमॅटो : टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवणे आपल्याला सर्वसाधारण बाब वाटेल, परंतु त्यामुळे टोमॅटोची चव कमी होते. त्यामळे टोमॅटो सरळ आपल्या स्वयंपाकघराच्या काउंटरवर परंतु पसरून ठेवा ज्यामुळे त्यांची चव कायम राहील आणि ते खराब होणार नाहीत.


९) कच्चे मांस : कच्चे मांस फ्रिजच्या वरच्या भागात ठेवू नका. जरी ते लवकर खराब होत असले तरी त्याच्यामुळे इतर पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून ते फ्रीजच्या सर्वात खालच्या शेल्फवर ठेवणे चांगले असते.


१०) ऑलिव्ह ऑईल : सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरातील गॅस शेगडीच्या जवळपास काचेच्या बाटलीत ऑलिव्ह ऑइल ठेवलेलं दिसते. परंतु ते तेल उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे जलद ऑक्सिडाईझ होते आणि त्यामुळे त्याची चव कमी होते. उष्ण ठिकाणापासून ते दूर ठेवा.


११) अवाकाडो : अवाकाडो पिकण्याच्या मार्गावर असले तरी ते फ्रिजमध्ये ठेवू नका. ते खोलीच्या सर्वसामान्य तापमानात ठेवा. आपल्याला जर ते लवकर पिकवायचे असेल तर तपकिरी रंगाच्या पिशवीत भरून खिडकीत ठेवा. अवाकाडोला तपकिरी रंग येऊ नये म्हणून त्यात लिंबू कापून ठेवा.


१२) कांदे आणि लसूण : स्वयंपाकघरात जाळीच्या टोपलीत कांदे आणि लसूण साठवून ठेवणे हा योग्य मार्ग आहे. त्यांना खेळती हवा मिळाली तर त्यांचे आयुष्य वाढते, त्यामुळे ते फ्रिजमध्ये ठेवू नका.
आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

No comments:

Post a Comment